अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: दुधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज राज्यभरात दूध बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अमरावती येथे भाजप व किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महमार्गावर  दुधाच्या गाड्या अडवून सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूध बंद आंदोलनाला सुरुवात; सांगलीत आंदोलकांकडून गाड्या अडवून गरिबांना दुग्धवाटप

महाराष्ट्रात दररोज दुधाचे उत्पादन १ कोटी ४० लाख लिटरच्या आसपास होते. कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या परीस्थितीमुळे राज्यातील सर्व दुध व दुधाच्या पदार्थाची विक्री करणारे साधने बंद झालेली आहे. परिणामी २० मार्च २०२० पासून पिशवी पाकिंग दुधाचा खप ३० ते ३५ टक्के पर्यंत पर्यंत खाली आलेला आहे. तसेच दुधाच्या उत्पादनांची विक्री १०% ते१५% पर्यंत खाली आलेली आहे. 

दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. तरी राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर १० रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दुध प्रती लिटर ३० रु. दराने खरेदी करावे. या मागणीलाछी अमरावती ऐथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज  राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या गाड्या अडवून आंदोलन केले व सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. या झोपलेल्या सरकारला जाग येत नसेल तर लोकप्रतिनिधींच्या घरातील दूध बंद करू असा इशारा माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिला.