अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, मुंबई : ६ ऑगस्टला खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर अमरावतीतच सुरुवातीचे उपचार करण्यात आले. पण, सुरुवातीला अमरावती येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना नागपुरातील वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरात उपचारांदरम्यानच बुधवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केले जाणार असून त्या मुंबई च्या दिशेने रवाना झाल्या आहेत. 


विमान वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होण्यास अधिव वेळ दवडला जात असल्या कारणानं त्यांना रस्ते मार्गानंच मुंबईत आणण्यात येत आहे. राणा यांना या प्रवासाकरता सुमारे १२ ते १५ तासांचा कालावधी लागणार आहे. सध्या राणा कुटुंबात आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही कोरोनाबाधित आहेत.



 


नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत.  त्यांचे पती आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत.