मुंबई : अमरावतीमधील उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर नवनवी धक्कादायक माहिती समोर येतेय. नुपूर शर्मा यांना समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती असे सांगितले जात आहे. त्यात आता जे लोक नुपूर शर्मा यांना समर्थन देत आहेत, त्यांना धमकीचे फोन येऊ लागले आहेत. डॉ गोपाल राठी यापैकी एक आहेत, ज्यांनी नुपूर यांच्यासाठी आय सपोर्ट नुपूर शर्मा असं व्हॉट्सऍप स्टेटस ठेवलं होतं. त्यानंतर त्यांना धमकीचे मसेज यायला सुरूवात झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ झिशान, डॉ सोहेल कादरी यांचे हे मेसेज आहेत. यात नुपूर शर्माचं समर्थन केल्याबद्दल धमकीवजा इशारे देण्यात आलेत. त्यानंतर डॉ. गोपाल राठी यांनी व्हिडीओद्वारे  माफी देखील मागितली आहे.


काय आहे उमेश कोल्हे हत्या प्रकरण?


खरंतर नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी 16 जून रोजी घटनेचा मास्टर माईंड इरफान शेख याने सगळ्या शूटरसोबत बैठक घेतली होती आणि याच बैठकीत उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.


त्यानंतर या घटनेतील मास्टरमाइंड इरफान शेख याला आज दुपारी न्यायालयात हजर करणार आहेत.


धक्कादायक माहिती अशी की, या हत्तेमध्ये एकून सात व्यक्ती सहभागी होते. ज्यामध्ये युसूफ हा उमेशचा खूप जवळचा मित्र होता आणि तो उमेशच्या अंत्यसंस्कारात देखील सहभागी झाला होता.


पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झाले आहे


उमेश कोल्हे यांच्यावर आरोपींनी ज्याप्रकारे हल्ला केला, त्यात उमेशच्या मेंदूच्या नसा, श्वासोच्छवासाची नळी, अन्नाची नळी, डोळ्याची रक्तवाहिनी चाकूने हल्ला केल्यामुळे फाटल्या होत्या.


तसेच पोस्टमॉर्टममध्ये ही जखम 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल असल्याचेही समोर आले आहे.