Amruta Fadanvis on Maharashtra CM: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. यात महायुतीला भरघोस यश मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडी पिछाडीवर गेलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार सत्तेत येणार आहे. दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाल्या अमृता फडणवीस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय मिळेल हे माहिती होतं. अशाप्रकारचा भूकंप आणणारा विजय अनपेक्षित होता.पण ज्याप्रकारे निकाल लागला ते पाहून आनंदी झाला. कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला. सर्वांनी एकत्र मिळून काम केलं, त्यामुळे विजय साकार झाल्याचे त्या म्हणाल्या.  


मला प्रचार करण्यासाठी 24 तास कमी पडत होते. मी नागपूरमध्ये सर्व कार्यकर्त्यांसोबत काम करत होती, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.


'देवेंद्र होणार मुख्यमंत्री?'


यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, 'मला इतकं माहितीय की सर्वांनी मिळून चांगलं काम केलंय. आता मुख्यमंत्री पदाचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि तिन्ही पक्षाचे नेते मिळून घेतेल. महाराष्ट्रासाठी जे चांगलं असेल तो निर्णय सर्व नेते मिळून घेतील.'


मुख्यमंत्री पदाबद्दल काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


मुख्यमंत्री पदावरुन कोणताच वाद नाही. पहिल्या दिवसापासून अमित शहांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय., सांगतलंय कुठल्याही निकषावर नाही. यासाठी निवडणुकीनंतर तिनही पक्ष एकत्र येऊन जो निर्णय घेतील, तो निर्णय असेल.निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र येतील आणि मुख्यमंत्री पदावर चर्चा करतील. एकनाथ शिंदे हे प्रमुख आहेत. ते तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन सर्वांचे म्हणणं ऐकून घेतील. यानंतर मुख्यमंत्री पदाबद्दल निर्णय घेतला जाईल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.