अरेरे! तीन शब्दांनी केली गडबड, अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल
एका सोशल मीडिया पोस्टमुळं....
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा सोशल मीडियावर बऱ्यापैकी वावर असतो. कौटुंबीक कार्यक्रमांपासून, ते आवडीनिवडी आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या भूमिका मांडत, नवनवीन उपक्रमांची माहिती देत त्या कायमच नेटकऱ्यांच्या या वर्तुळात वावरत असतात. अशा या अमृता फडणवीस यांची सध्या मात्र खिल्ली उडवली जात आहे.
एका सोशल मीडिया पोस्टमुळं त्यांनी पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ज्यामुळं त्यांना या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. सार्वजनिक आरोग्य या विषयाला हाताळणाऱ्या एका वेबिनारला त्यांनी उपस्थिती लावली होती. कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. याचदरम्यानची काही छायाचित्र अमृता यांनी ट्विटरवर पोस्ट केली.
अमृता फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या याच फोटोंपैकी एका फोटोमध्ये त्यांनी कागदावर लिहिलेल्या शब्दांनीच थेट या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 'फोटो लेते रहो' असं त्यांनी कागदावर लिहिलं आहे. ज्यामध्ये फोटोची स्पेलिंग चुकीची आल्याचं हेरत नेटकऱ्यांनी तितकाच भाग सोशल मीडियावर अपलोड केला आणि पुन्हा एकदा त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर अमृता यांच्या या फोटोंवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता, त्यांचं ट्विट आणि हा फोटो कमालीचा चर्चेत आला असून तो मोठ्या प्रमाणात शेअरही केला जात आहे.