Akola Crime News : वाहन चोरीच्या अनेक घटना घडत असतात. अकोल्यामध्ये अजब प्रकारची चोरी झाली आहे.  रुग्णालय परिसरातूनच रुग्णवाहिका चोरीला गेली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून चोरट्यांनी रुग्णवाहिका का चोरली याची देखील चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून रुग्णवाहिका चोरी गेल्याची घटना घडलीय. रुग्णाला उपचारासाठी दाखल करून चालक जेवणासाठी गेला असता ही घटना घडलीय. मुख्य म्हणजे ही रुग्ण वाहिका रुग्णालय परिसरातील पोलीस चौकी जवळ उभी होती. चोरट्यांनी मध्यरात्रीचा फायदा घेत ही चोरी केली आहे.


तब्बल 111 बाईक चोरल्या


नागपुरात एका चोरट्यानं दोन वर्षांत तब्बल 111 दुचाकी चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. बारावी पास असलेल्या ललित भोगेनं चोरलेल्या बाईक आजूबाजूच्या 9 जिल्ह्यात विकूनही टाकल्या. चोरी करून चोरटा ललित भोगे फरार व्हायचा. याच्याविरोधात तक्रारी वाढत गेल्याने पोलिसांनी अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी हा सराईत बाईकचोर पोलिसांच्या हाती लागला...पोलिसांनी याच्यावर पाळत ठेवून ताब्यात घेतलं आणि याला पोलिसी खाक्या दाखवताच 111 बाईक चोरल्याची कबुली दिली. 


भंडारा येथे भीषण अपघात


भंडारा वरून रामटेक येथे जात असलेल्या एसटीच्या चालकाने भंडारा शहरातील शास्त्री चौक येथे दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे.  त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला-आर्णी राष्ट्रीय महामार्गाला तडे 


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील मुख्य राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देऊन त्यांची नव्याने उभारणी करण्यात आली. मात्र, अकोला-आर्णी या सिमेंट काँक्रीटच्या महामार्गाला अवघ्या तीन वर्षांत तडे जाऊन अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मानोरा परिसरात नालीसदृश मोठमोठे तडे पडल्यामुळं महामार्गावरून वाहने चालींवताना अपघात होण्याची शक्यता असल्याने बांधकाम विभागाचे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.