महाराष्ट्रातील अनोखे आश्रयस्थळ; प्रेमासाठी घरातून पळून आलेल्या जोडप्यांना येथे मिळतो आश्रय
Love Marriage : प्रेमात पळून जाऊन जातीय,आंतरजातीय नवविवाहितांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने साताऱ्यात आश्रयस्थळ बनवण्यात आले आहे.
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : प्रेमाला जाती पातीचं बंधन नसतं. मनाशी मनाचे सुर जुळले की जातीपातीच्या मर्यादा देखील ओलांडल्या जातात. समाजाचा विरोध जुरगारुन अनेक जोडपी जातीय, आंतरजातीय विवाह करतात. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या या जोडप्यांना समाजाविरोधात लढावं लागतं. घरातून पळून जाणाऱ्या बऱ्याच जोडप्यांना कुठेच आश्रय मिळत नाही. सुखासाठी संघर्ष करणाऱ्या जोडप्यांचा समाजाविरोधीत लढाईत पराजय होतो. यामुळेच सैराट सारख्या घटना घडतात. तर, काहीज आत्महत्येचे पाऊल उचलतात. मात्र, अशा जोडप्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदार देणार आहे. प्रेम प्रकरणात घरातून पळून जाणाऱ्या जोडप्यांसाठी साताऱ्यात आश्रयस्थळ सुरु करण्यात आले आहे.
पळून आलेल्या जोडप्यांना मिळणार सुरक्षा
सातारा -सातारा जिल्ह्यातील एका गावात आंतरजातीय, आंतरधर्मीय त्याच बरोबर सहजातीय विवाहानंतर अनेक युवक-युवती घरातल्यांच्या दबावामुळे त्याचवर होणाऱ्या जीवघेणी हल्ल्याच्या घटनांना प्रेमयुगलांना सामोरे जावे लागते. या प्रेमयुगलांचे सुरुवातीच्या दिवसी सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’तर्फे सातारा जिल्ह्यात राज्यातील पहिले ‘सुरक्षित आश्रयस्थळ’ उभारण्यात आले आहे.
महाराष्ट्र अंनिस’ गेली अनेक वर्षे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील पहिले सुरक्षा निवारण केंद्र हे साताऱ्यात सुरू करण्यात आला आहे. मागील चार वर्षांपासून हे केंद्र गोपनीय पद्धतीने साताऱ्यात सुरू आहे.
हरियाणा, पंजाब यामध्ये अशा प्रकारची सुरक्षा निवारण केंद्र पाहिल्यानंतर याची संकल्पना महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय डॉक्टर हमीद दाभोळकर आणि शंकर कणसे यांच्या मनात आला. कुटुंबीयांच्या टोकाचां विरोध, धमक्या, मारहाण,जीवघेण्या हल्ल्यापर्यंतच्या संकटांना नवदांपत्यांना तोंड द्यावे लागते. याच परिस्थितीचा विचार करून सातारा जिल्ह्यात पहिले आश्रयस्थळ म्हणजे सुरक्षा निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
आश्रयस्थळात लावला 29 जोडप्याचा विवाह
आश्रयस्थळी दाम्पत्यांना आधार,निवारा देत असताना. अंनिस मार्फत समुपदेशन त्याच बरोबर येथे येणाऱ्या सर्व प्रेम युगलांची मुलाखत देखील घेण्यात येते. या मुलाखतीत त्यांनी लग्न केल्यानंतर ते कशा पद्धतीने राहणार? त्याची उत्पन्नाचे साधन काय ? त्यांचे शिक्षण त्यांच्या आवडी निवडी काय? एकमेकांना निवडत असताना काय बघून एकमेकाला पसंत केलं? हे दाम्पत्य एकमेकांसाठी योग्य आहे का? हे बघितलं जाते .जर ते योग्य नसतील तर त्यांना परत सुद्धा पाठवलेला जाते. आतापर्यंत अंनिसा मार्फत 29 विवाह लावले, 29 विवाह मधील सुरक्षा निवारा केंद्र मार्फत 15 जोडप्यांनी याचा लाभ घेतला आहे.