रत्नागिरी : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एल्गार पुकारला. आपल्या मागण्यापुर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आज जेलभरो केले. शेकडो अंगणवाडी सेविकांनी स्वतःहून आपल्याला जेलभरो केला. रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रिडा संकुलात मंडणगडपासून ते राजापूर तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जमल्या. अंगणवाडी सेविकांच्या अनेक समस्या तशाच प्रलंबित आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाही, असे म्हटले होते.  तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केले, असे थेट आरोप अंगणवाडी सेविकांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ ताबडतोब करण्यात यावी, गेल्या सात महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना मानधन मिळालेले नाही ते तातडीने मिळावे, तसेच 2015 सालापासून प्रवासभत्ता मिळालेला नाही, तो मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी सेविकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर स्वतःहून शांततेच्या मार्गांनी या अंगणवाडी सेविकांनी जेलभरो केले.


मालेगाव येथे जेलभेरो


अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ करावी, सेवेत कायम करावे यासह विविध प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज अंगणवाडी सेविका संघटनेच्या मालेगाव येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी  किदवाई रोड येथून  नगरसेविका शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या नेतृत्वाला खाली काढण्यात आलेल्या मोर्च्यांत शेकडो अंगणवाडीसेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी  शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोहम्मद अलीरोड मार्गे मोर्चा  शहर पोलीस स्टेशन मोर्चा आला असता पोलिसांनी आंदोलक अंगणवाडी सेविकांना अटक करून सुटका केली.