राज्यातल्या २ लाख अंगणवाडी सेविका संपावर
विविध मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्रातील २ लाख अंगणवाडी कर्माचारी महिलांनी संप पुकारलाय.
कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्रातील २ लाख अंगणवाडी कर्माचारी महिलांनी संप पुकारलाय. कोल्हापुरातील अंगणवाडी सेविकांनीसुद्धा या संपात भाग घेतला असून या सेविकेनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.
महाराष्ट्र सरकारनं अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनवाढीसाठी समिती गठीत केली होती. या समितीनं अभ्यास करुन शासनाकडं अहवाल देखील सादर केला. तरी देखील सरकारनं यावर अजून निर्णय घेतलेला नाही.
या खात्याच्या मंत्री पकंजा मुंडे यांनी देखील विधानभवनमध्ये बैठक घेऊन एक महिन्यात मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडून मंजूर करुन घेवून मंत्रीमंडळापुढं मंजुरीसाठी ठेवतो असं आश्वासन अंगणवाडी सेविकांनी दिलं होतं. तरी देखील या संदर्भात पावलं सरकारनं टाकलेली नाहीत असा आरोप अंगणवाडी सेविकांचा आहे. त्यामुळे संतापलेल्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सुरु केलंय.