अंगारकी चतुर्थी: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भविकांची गर्दी
अंगारकीचतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात स्वराभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं.
पुणे: अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज (मंगळवार, ३१ जुलै) पहाटे 3 वाजल्या पासूनच मंदिर दर्शना साठी खुलं करण्यात आलं. त्या नंतर गायक प्रथमेश लघाटे याने बाप्पा समोर स्वराभिषेक सादर केला. तर आज दिवसभर मंदिरात गणेश याग केला जाणार आहे. नेहमीप्रमाणे मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आलीय. या सजावटीत सर्व मंगल कलश वापरण्यात आले आहेत. गणरायाचा अशिर्वादाचा वर्षाव सर्व भक्तांवर व्हावं या कल्पनेतून ही सजावट करण्यात आली आहे.
मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांची गर्दी
अंगारकी चतुर्थी निमित्त मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी मोठी गर्दी केलीये. सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. सिध्दिविनायकासाठी फुलांची खास आरास करण्यात आली. दुसरीकडे पुण्यातलं श्रीमंत दगुडशेठ गणेश मंदिरही पहाटे तीन वाजल्यापासून पुणेकरांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. दिवसभर मंदिरात गणेश यागासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर!
दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २२२५ बसेसची सोय केलीय. येत्या ९ ऑगस्टपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. तसेच ग्रुप बुकिंगला १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येणार आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलंय.