धुळे : भाजप आमदार अनिल गोटे यांनी आपले बंडाचे निशाण कायम ठेवत धुळे महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाने दुर्लक्ष केल्याने गोटे यांनी बंडाचं निशाण फडकावलंय. भाजपाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचेच नेतृत्व कायम ठेवत आमदार गोटे यांना ठेंगा दाखवला. त्यामुळे आमदार गोटे प्रचंड नाराज झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने दगा केल्यानंतर गोटे यांनी स्वाभिमानी भाजप आणि लोकसंग्राम पक्षाच्या नावाने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. महापौर पदाच्या शर्यतीतूनही त्यांनी माघार घेतली असून, त्यांच्या पत्नी हेमा गोटे या त्यांच्या स्वाभिमानी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार राहणार आहेत. 


दरम्यान, आपण हे निर्णय मुख्यत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून घेण्याचे आमदार गोटे यांनी आवर्जुन सांगितले. आपण महापालिका निवडणूक स्वतंत्र लढत असलो तरी आपण भाजपचेच आमदार राहणार आसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 


ठळक बाबी


- आमदार अनिल गोटे यांचे बंड कायम. 
- स्वाभिमानी भाजप आणि लोकसंग्राम च्या नावाने निवडणूक लढवणार.
- आमदार पदाचा राजिनामा देणार नाही - अनिल गोटे 
- धुळे महापालिका निवडणुकीत भाजप विरुध भाजप असा सामना 
- लोकसंग्राम पक्षाच्या छत्राखाली निवडणूक लढवणार.
- आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात  
- महापौर पदाची गोटे यांची स्वत:ची उमेदवारी मागे