विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी
Mumbai Graduate Constituency election 2024 : विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
Vidhan Parishad Maharashtra : विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी झाले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या किरण शेलारांचा पराभव केला. अनिल परब 44 हजार 784 मतांनी विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी किरण शेलार यांना 18 हजार 772 मतं मिळाली. दुसरीकडे शिक्षक मतदारसंघाचे ज.मो. अभ्यंकरही 649 मतांनी विजयी झाले आहेत.. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय.
विधान परिषदेच्या 4 जागांचा आज निकाल लागणार आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई, कोकण मतदारसंघात अनिल परब, किरण शेलार, डावखरेंची प्रतिष्ठा पणाला लागली.
विधानपरिषदेच्या जागांवरुन एकनाथ शिंदेंची डोकदुखी वाढण्याची शक्यताय... दोन जागांसाठी इच्छुकांची भाऊ-गर्दी झालीय. संजय मोरे, मनिषा कायंदे, भावना गवळी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने हे विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत... लोकसभेत उमेदवारी नाकारलेल्यांची विधानपरिषदेत पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी करण्यात आलीय..