परभणी : महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे आणि उपमहापौरपदी काँग्रेसचेच भगवान वाघमारे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. या ठिकाणी काँग्रेसला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अप्रत्यक्ष मदत केली. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुपस्थित राहीलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या अनिता रवींद्र सोनकांबळे यांनी भाजपच्या मंगल अनिल मुदगलकर यांचा पराभव केला. भाजपच्या उमेदवारांना आठ मते पडली तर काँग्रेसच्या उमेदवार अनिता सोनकांबळे यांना ३७ मते मिळालीत. या विजयानंतर काँग्रेसकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, पराभवामुळे भाजपच्या गोठात शांतता दिसून आली.



दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एका गटासह १४ नगरसवेक तटस्थ राहिलेत. सहा सदस्य हे अनुपस्थित राहिलेत. तर उपमहापौर पद निवडणुकीत काँग्रेसचे भगवानराव वाघमारे विजयी झाले असून त्यांना ३७ मते पडलीत. तर भाजपचे मोकिंद खिल्लारे हे पराभूत झालेत. त्यांना आठ मते मिळालीत. याही निवडणुकीत शिवसेनेचे पाच सदस्य आणि राष्ट्रवादीचे १० असे एकूण १५  तटस्थ राहिले. तर ५ नगरसेवक गैरहजर राहिलेत. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी झाली.