राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत. राळेगणसिद्धी येथे अण्णांनी हि घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकपाल बिल, स्वामिनाथन आयोग, शेतक-यांची कर्जमाफी, निवडणूक चिन्ह अशा विविध प्रश्नांवर अण्णा आंदोलन करणार आहेत. राळेगणसिद्धी येथे दोन दिवस बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी अण्णांनी ही घोषणा केलीय.


दिल्ली येथील आंदोलनाच्या आधी अण्णा देशव्यापी दौरा करणार आहेत. प्रत्येक राज्यात सभा घेऊन आंदोलनाचे मुद्दे जनतेला पटवून देऊन आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करणार आहेत. यावेळी अण्णांनी सरकारवर शरसंधान साधलं.