राळेगणसिद्धी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून अण्णा हजारे यांना अश्रू अनावर झाले. नरेंद्र मोदी यांचं बालपण अतिशय कष्टात गेलं असं म्हणतात, म्हणून चित्रपट निर्माते महावीर जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर एका लघु चित्रपट बनवला. हा सिनेमा मंगेश हदावले यांनी दिग्दर्शित केला आहे. 'चलो जीते है' या सिनेमाची एक विशेष स्क्रीनिंग, राळेगणसिद्धीमध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमसाठी आयोजित करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चलो जीते है' हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालवयीन घटनांशी प्रेरीत आहे. हा लघू-सिनेमा पहिल्यानंतर अण्णा हजारे भावूक झाले. एक क्षण असा आला की त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, असं चित्रपट निर्मात्याकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.


या लघुचित्रपटाचा उद्देश निस्वार्थी सेवा आणि दयाळूपणाचा मूळ संदेश प्रसारीत करणे आणि इतरांमध्ये योग्य संस्कृती रुजवणे आहे, हा असल्याचं निर्मात्यानं म्हटले आहे. 


विशेष म्हणजे, ज्येष्ठ समाजसेवक यांना शार्ट फिल्म भरपूर आवडली असल्याचं, या चित्रपटासाठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. अण्णा हजारेंच्या गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रपटाचं स्क्रीनिंग करणार असल्याचे निर्मात्याने अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.