अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांना खरमरीत पत्र (Anna Hazare's letter to BJP) लिहिले आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्र लिहून दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या भाषण भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनामध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती. मात्र, अण्णांनी या पत्राचा चांगलाच समाचार घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रात आपले ( BJP) सरकार आहे. अशात आपल्याला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीची गरज का पडते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या देशात कोणताही पक्ष देशाला उज्वल भविष्य देण्यात कमी पडत आहे, अशी खंत व्यक्त केली आहे. अण्णा हजारे यांनी भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्यास नकार दिल्याने भापलाच चांगलाच दणका मिळाला आहे.


दरम्यान, दिल्लीतील बऱ्याच व्यवस्था केंद्राच्या अधीन असल्याने तेथील भ्रष्टाचार केंद्र सरकार आटोक्यात आणू शकते. परंतु असे होताना दिसत नाही, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या दुष्टचक्रात असलेल्या या देशात कोणताही पक्ष देशाला उज्वल भविष्य देऊ शकत नाही का, अशी खंतही व्यक्त केली आहे. त्याचवेळी भाजपचे अण्णा हजारे यांनी कान या पत्रातून टोचले आहेत.