राळेगणसिद्दी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. महाराष्ट्रात लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारपासून अण्णांनी उपोषण सुरू केले. सलग चार दिवस होऊनही सरकार अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने राळेगणसिद्दी येथील ग्रामस्थांनी पालनेर-वाडेगव्हाण रस्ता रोखून धरला आहे. ग्रामस्थांच्या रास्तारोको आंदोलनात विद्यार्थ्यांही सहभाग झाल्याचे पाहायला मिळाले. या उपोषणावेळी अण्णांचे ३ किलो वजन घटले आहे. लोकपाल आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणावेळी काही झाल्यास त्यास मोदी सरकारच जबाबदार असेल असे अण्णांनी माध्यमांशी संवाद साधतान स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अण्णांनी अनेकदा पत्र पाठवूनही सरकार अनेकदा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मांडली. गेल्या ५ वर्षांत आण्णांनी सरकारला ३५ पत्रे पाठवली मात्र सरकारकडून केवळ दोन पत्रांची उत्तरं आली आहेत, ही बाब मांडत ग्रामस्थांनी परिस्थिती सर्वांसमोर उघड केली. दरम्यान, या मागण्या मान्य करण्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरीही राज्य किंवा केंद्र सरकारकडून मागण्यांबाबत कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे अण्णांनी सांगितले.