अण्णा हजारेंचे राळेगणसिद्धी येथे मौन आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे मौन आंदोलन
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे मौन आंदोलन सुरू केले आहे. 2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी अण्णा मौन आंदोलन करत आहेत. सरकार कडून कडक कायदे होत नाहीत आणि न्यायालयातील रिक्त पद भरली जात नाहीत त्यामुळे आरोपींना शिका मिळण्यास उशीर होतो.
नुकतेच हैदराबाद येथे पोलिसांनी आरोपिंच एन्काऊंटर केलं या घटनेच समाजात सर्वत्र कौतुक केलं गेलं. असा न्याय चुकीचा असला तरी नागरिकामध्ये याबद्दल समाधान व्यक्त होतांना दिसल. माझं मौन सरकारला जाग करण्यासाठी आहे. त्यांनी कडक कायदे करावेत आणि न्यायालयातील रिक्त पद भरावीत.
अण्णा हजारे यांनी २०११ मध्ये जनलोकपालसाठी १२ दिवसाचं उपोषण केले होते. यासाठी त्यांना संपूर्ण देशातून समर्थन मिळालं होतं. 'मै भी अण्णा' म्हणत देशभरातील तरुण या आंदोलनात एकवटले. या आंदोलनाची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी घेतली.