ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या उपोषणावर ठाम
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन ऑक्टोबरच्या आपल्या उपोषणावरती ठाम आहेत.
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन ऑक्टोबरच्या आपल्या उपोषणावरती ठाम आहेत. केंद्र सरकारने लोकपालावरती समिती गठीत केली असली तरी जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अण्णा हजारे आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वीच अण्णांची भेट घेतली होती. त्याभेटीनंतर अण्णा आंदोलन करणार नाहीत असा आशावाद महाजन यांनी व्यक्त केला होता. मात्र अण्णा आपल्या उपोषणावरती ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय.