अण्णा हजारेंचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार, २३ मार्चपासून आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात पुन्हा एल्गार केलाय.
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा केंद्र सरकारविरोधात पुन्हा एल्गार केलाय. २३ मार्चपासून जंतरमंतरवर आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौऱ्यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नसल्याची टीका, यावेळी अण्णा यांनी केली.
लोकपालची अंमलबजावणी नाही!
आपण लोकांसाठी आंदोलन करत आहे. हार्ट ॲटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं, म्हणून उपोषण करणारच, असा निर्धार अण्णा हजारे यांनी केलाय. लोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
टीम अण्णा फुटली म्हणून..
दरम्यान,यावेळी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडून राजकारणात जाणार नाही, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहोत, असे अण्णा यांनी स्पष्ट केले. याआधीची टीम अण्णा फुटली किंवा ती फोडण्यात आली. ती फुटली नसती तर देशाचं चित्र खूप सुंदर राहिलं असंतं. टीम अण्णा फुटल्यामुळं देशाचं नुकसान झालं, अशी खंत हजार यांनी व्यक्त केली.
अण्णा हजारे ठळकबाबी
- लोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन
- सरकारला ४३ पत्र लिहिली, उपयोग झाला नाही. पंतप्रधान विदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना माझ्या पत्रांची दखल घ्यायला वेळ मिळाला नाही
- सरकारला पुरेसा वेळ दिला आणि मग आंदोलनाचा निर्णय घेतला
- माझ्या आंदोलनाचा कुणाला फायदा, कुणाला तोटा झाला याचा विचार मी करत नाही. आंदोलनाचा समाजाला, देशाला उपयोग झाला हे महत्वाचं आहे.
- कुठलाच पक्ष धुतल्या तांदुळासारखा नाही
- यावेळी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडून राजकारणात जाणार नाही, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून घेणार
- याआधीची टीम अण्णा फुटली किंवा ती फोडण्यात आली. ती फुटली नसती तर देशाचं चित्र खूप सुंदर राहिलं असंतं. टीम अण्णा फुटल्यामुळं देशाचं नुकसान झालं.
- अरविंद केजरीवाल राजकारणात गेल्यापासून मी त्यांच्याशी संपर्क तोडलाय.
- मला तरुणाईकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मी प्रचंड आशावादी आहे.
- हार्ट ॲटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं, म्हणून उपोषण करणारच.