Big News : पंकजा मुंडे, रक्षा खडसे, सुजय विखे पाटील... महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर
Maharashtra politics : भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातून 20 नावांची घोषणा. अनअपेक्षित नावांची घोषणा
BJP Loksabha Candidate list 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे, रक्षा खडसे, सुजय विखे पाटील यांच्यासह . महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवरांची यादी जाहीर झाली आहे. भाजपची दुसरी यादी अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपने अनअपेक्षित नेत्यांची यादी जाहीर केली आहे.
भाजप आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा आज होणार आहे. यात महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांचीही घोषणा होऊ शकते. नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, संजयकाका पाटील या विद्यमान खासदारांसह राज्यातून मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणे यांची नावे या यादीत आली आहेत. यासोबतच उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, कर्नाटकातील उमेदवारांची नावं आज जाहीर होणार आहेत...त्यामुळे महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र भाजपची यादी जाहिर
नंदुरबार - हिना गावित
धुळे - सुभाष भामरे
जळगाव - स्मिता वाघ
रावेर - रक्षा खडसे
अकोला - अनुप धोत्रे
वर्धा - रामदास तडस
नागपूर - नितीन गडकरी
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
नांदेड - प्रतापराव चिखलीकर
जालना - रावसाहेब दानवे
दिंडोरी - भारती पवार
भिवंडी - कपिल पाटील
मुंबई उत्तर - पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व - मिहिर कोटेचा
पुणे - मुरलीधर मोहळ
अहमदनगर - सुजय विखे पाटील
लातूर - सुधाकर सुंगारे
बीड - पंकजा मुंडे
माढा - रणजित नाईक निंबाळकर
सांगली - संजय काका पाटील
भाजपच्या पहिल्या यादीत पत्ता कट झालेले खासदार
जळगाव - उन्मेश पाटील
उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी
उत्तर पुर्व - मनोज कोटेक
चंद्रपूर - हंसराज अहिर
बीड - प्रितम मुंडे