गौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी एकजण ताब्यात
कर्नाटक SITने बेळगावच्या आणखी एका तरुणाला ताब्यात घेतलायं.
मुंबई : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक SITने बेळगावच्या आणखी एका तरुणाला ताब्यात घेतलयं. महाराष्ट्रात जप्त केलेल्या वाहनाचा मालक असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. कर्नाटक SIT चे पथक बेळगाव मधे तळ ठोकून आहे.
आरोपी गजाआड
गेल्या काही दिवसात कर्नाटक एसआयटीनं गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अनेक महत्वाचे आरोपी गजाआड केले आहेत. तपासातला प्रत्येक दुवा सांधण्याचा एसआयटीचा प्रयत्न असून त्या अंतर्गतच आज आखणी एक संशयित ताब्यात.
कळसकरचीही चौकशी
पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीचीही शक्यता आहे. कर्नाटक एसआयटीची टीम महाराष्ट्राकडे रवाना झालीय. दाभोलकर हत्याप्रकरणी जप्त केलेल्या मोटरसायकलींची पाहणी करण्यात येणार आहे. दाभोलकर आणि लंकेश हत्येसाठी एकाच दुचाकीचा वापर केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
कळसकरकडून जप्त केलेली दुचाकी लंकेश हत्याप्रकरणात वापरल्याची कर्नाटक एसआयटीला माहिती मिळालीय. त्यावरून ही चौकशी करण्यात येणार आहे.