रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण मार्गावरील लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. (Ratnagiri : Lote MIDC Blast) हा स्फोट इतका भयानक होता की परिसरातील लोकांत भीतीचे वातावरण पसरले होते. लोटे औद्योगिक वसाहतीतील फार्मा कंपनीत हा मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात लोटे एमआयडीत ( Lote MIDC ) मोठा स्फोट झाला होता.  लोटे एमआयडीसीमधील (Lote MIDC Blast) घरडा केमिकल कंपनीत भीषण (Gharda Chemicals company) स्फोट झाला होता. या स्फोटात सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. 20 मार्च 2021 रोजी शनिवारी सकाळी एकापाठोपाठ एक असे दोन स्फोट झाले होते. या स्फोटामुळे कंपनीला आग लागली. यामध्ये अनेक कामगार जखमी झाले.  


घरडा केमिकल कंपनीतील बॉयलर गरम होऊन अचानक स्फोट झाला. या स्फोटात सहा जण जखमी झाले होते. तर स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे कंपनीत 40-50 जण अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.