कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ३४ वर्षीय व्यक्ती  शाहूवाडी तालुक्यातील उचतमधील रहिवासी आहे. तो दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. तबलिगी जमातच्या कार्यक्रमनंतर तो कोल्हापुरात आला. या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन  करण्यात आले आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात ही संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पुढे येत आहे. लॉकडाऊन उठण्याचे काही दिवस शिल्लक असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्यावर गेला आहे. तसेच मृत्यूच्या प्रणात काहीशी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच राज्यात मरकज येथून आलेल्या व्यक्तींमुळे अनेक ठिकाणी कोरोनाची लागण झाली आहे. आता यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश झाला आहे.



दरम्यान, मुंबईत धारावी झोपडपट्टी आतापर्यंत सापडलेल्या सर्व  १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे केसेसचे मरकज कनेक्शन असल्याचं समोर आले आहे.  मुंबई महापालिका प्रशासनानं याबाबत माहिती दिली आहे. धारावीत सापडलेले सर्व रूग्ण हे सर्व दिल्ली निझामुद्दीनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. धारावीतील सर्व कोरोनाबाधित हे एकाच मशिदीत जात होते. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली.दरम्यान, मरकजहून आलेल्या या व्यक्तीनंतर केरळला रवाना झाल्या. .