रत्नागिरी : शहरानजिकच्या राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यातील हा दुसरा कोरोनाचा रुग्ण आहे. गुहागरमधील कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. दरम्यान, काल दुसरा रुग्ण आढल्याने राजीवडा परिसरातील तीन मिलीमीटरचा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित, करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हा परिसर कंटेंटमेंट झोन घोषित केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणीही आत किंवा बाहेर जाऊ शकणार नाही. तर पुढील दोन किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आलाय. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. 



  रत्नागिरीत कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता साऱ्या यंत्रणा हाय अलर्ट झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राजीवडा परिसर सील करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंडे यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणीही आत किंवा बाहेर जाऊ शकणार नाही. यावेळी पत्रकार परिषदेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,  जिल्‍हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा उपस्थित होते.  नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही,असे आवाहन यावेळी करण्यात आले.