पुणे : जिल्ह्यातील बारामतीत कोरोनाचा धोका आणखी  वाढला आहे. काल पुन्हा  एकदा कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे बारामतीत कोरोना बाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. शहरात  मेडिकल विक्रेत्याच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली आहे.  आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गाने एकाचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा फैलाव होत असल्याने बारामती शहरात लॉकडाऊनची कडक अमलबजावणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक असणारी प्रत्येक वाहने पोलीस तपासत आहेत. त्यानंतर या वाहनांना पुढे सोडण्यात येत आहे. तर ठिकठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून घराबाहेर पडणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. विनाकारण कारण बाहेर फिरणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे



बारामती शहरातल्या म्हाडा कॉलनीतल्या ७७ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे.  हे वृद्ध घरीच असता, अशी माहिती आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा एका मेडिकल दुकानात  कामाला आहे. त्यामुळे आता तपासणी सुरु करण्यात आली आहे. 


या वृद्धाला  नेमकी कोणत्या माणसाकडून लागण झाली याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे . चार दिवसांपूर्वीच बारामतीत कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर प्रशासनानं तीव्र उपयोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे बारामतीत संक्रमण रोखण्यास मदत होईल, असे वाटत असतानाच आज पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण आढळल्याने बारामतीकरांच्या टेन्शन वाढले आहे.