मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून त्यांना उत्तर दिलंय. अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या आमदारांसोबत गुवाहटीमध्ये आहेत. शिंदे समर्थक आमदारांना आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत काही आमदार बसलेले दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अडीच वर्षात केवळ घटकपक्षांचाच फायदा झाला मात्र यात शिवसैनिक भरडले गेले. शिवसेनेचं पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आलं. त्यामुळे आता महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय.


या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे काही कागदांवर सही करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत बच्चू कडू, प्रताप सरनाईक आणि इतर आमदार ही दिसत आहेत.



मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर सरळ समोर येऊन सांगा. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. असं फेसबुक लाईव्हद्वारे उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिवसैनिकांना आवाहन केलं होतं.