उद्धव ठाकरेंची अँजिओग्राफी, गरज वाटल्यास अँजिओप्लास्टी! पण दोघात नेमका फरक काय? काय केलं जातं

अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोघांमध्ये फरक काय असतो? या शस्त्रक्रियेत नेमकं काय केलं जातं? ही शस्त्रक्रिया किती वेदनादायक असते? यासाठी किती वेळ लागतो?

| Oct 14, 2024, 16:57 PM IST

Angiography and Angioplasty: अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोघांमध्ये फरक काय असतो? या शस्त्रक्रियेत नेमकं काय केलं जातं? ही शस्त्रक्रिया किती वेदनादायक असते? यासाठी किती वेळ लागतो?

1/10

उद्धव ठाकरेंची अँजिओग्राफी, गरज वाटल्यास अँजिओप्लास्टी! पण दोघात नेमका फरक काय? काय केलं जातं?

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हार्ट ब्लॉकेजच्या चेकअपसाठी  रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. गरज वाटल्यास त्यांची अँजिओप्लास्टीदेखील केली जाऊ शकते. पण या दोघांमध्ये फरक काय असतो? या शस्त्रक्रियेत नेमकं काय केलं जातं? ही शस्त्रक्रिया किती वेदनादायक असते? यासाठी किती वेळ लागतो? 

2/10

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

याला बलून अँजिओप्लास्टी आणि पर्क्यूटेनियस ट्रान्सल्युमिनल अँजिओप्लास्टी असेही म्हणतात. या शस्त्रक्रियेचा उपयोग धमनी एथेरोस्क्लेरोसिसमुळे होणाऱ्या अवरोधित किंवा अरुंद धमन्या आणि शिरा रुंद करण्यासाठी केला जातो.

3/10

अँजिओप्लास्टीचा उद्देश काय?

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

हृदयविकाराचा झटका कोरोनरी धमन्यांमध्ये (हृदयाच्या रक्तवाहिन्या) ब्लॉक झाल्यामुळे येतो. कोरोनरी धमन्या या रक्तवाहिन्या असतात ज्या हृदयाला रक्त पुरवठा करतात. या कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज आल्यावर हृदयाला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. तो ब्लॉक काढला नाही तर त्यामुळे एनजाइना होऊ शकतो.

4/10

अँजिओप्लास्टीमध्ये काय होते?

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

हृदय कमकुवत होते आणि हृदयाला रक्तपुरवठा मंद राहिला तर रक्तप्रवाह सुधारण्यासाठी किंवा अडथळा दूर करण्यासाठी कोणतेही औषध नाही. ब्लॉकेज वाढतच राहतात. जर 70% पेक्षा जास्त धमन्या ब्लॉक झाल्या आणि त्यामुळे बाधित भागाला होणारा रक्तपुरवठा कमी होऊ लागला, तर फुग्याच्या साहाय्याने त्यात स्टेट टाकून धमनीचा विस्तार केला जातो. 

5/10

70% पेक्षा जास्त ब्लॉकेज

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

फुग्याने धमनी फुगवली आणि तशीच सोडली तर धमनीच्या भिंती कोसळू शकतात आणि अचानक ब्लॉकेजमुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. म्हणून ज्या रुग्णांच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये 70% पेक्षा जास्त ब्लॉकेज आहे त्यांच्यासाठी अँजिओप्लास्टी करणे अनिवार्य असते.

6/10

अँजिओप्लास्टी ही मोठी शस्त्रक्रिया आहे का?

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

हृदयात कॅथेटर ठेवून अँजिओग्राफी केली जाते. नंतर अत्याधुनिक मशिन्सच्या मदतीने डाई इंजेक्ट करुन फोटो काढले जातात. अँजिओप्लास्टी करतो म्हणजे ती शस्त्रक्रिया नसते. यावेळी कॅथेटरच्या साहाय्याने रुग्णामध्ये स्टेंट टाकली जाते. जी एक प्रकारची नळी आहे. यात टाके घालण्याची गरज नसते.

7/10

कॅथेटर काढतात

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्जन कॅथेटर काढून टाकतात. ज्या ट्यूबमधून कॅथेटर टाकले होते ते देखील काढून टाकले जाते. यानंतर रुग्णाला आराम मिळतो. रुग्ण दुसऱ्या दिवसापासून चालू शकतो, असे डॉक्टर सांगतात.

8/10

शस्त्रक्रिया किती तासांची

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

अँजिओप्लास्टीची वेळ अनेक गोष्टींवर अवलंबून असते. ज्यामध्ये आजाराची गुंतागुंत किती आहे? आजार किती गुंतागुंतीचा आहे? धमनीत कॅल्शियम आहे की नाही? तसेच, त्यासाठी ओसीटी (ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी) सारख्या विशेष उपकरणांची आवश्यकता आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. हे आवश्यक असल्यास अँजिओप्लास्टी प्रक्रियेस 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

9/10

जास्त वेळ कधी लागू शकतो?

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

जेव्हा अँजिओप्लास्टीची प्रक्रिया गुंतागुंतीची असते आणि त्यासाठी अधिक मॅन्युअल आणि विशेष उपकरणांची गरज लागते. तेव्हा ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी दीड ते दोन तास लागू शकतात. जर स्टेंट फक्त एकाच रक्तवाहिनीत टाकावा लागला तर कमी वेळ लागतो. मात्र तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये अँजिओप्लास्टी करावी लागली तर अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

10/10

प्रक्रिया किती वेदनादायक?

Uddhav Thackeray Heart difference between angiography and angioplasty Health Marathi News

एका रक्तवाहिनीसाठी सुमारे 30 मिनिटे लागतात आणि जेव्हा प्रक्रिया अनेक रक्तवाहिन्यांमध्ये करावी लागते. उदाहरणार्थ 2 किंवा 3 रक्तवाहिन्यांसाठी दीड ते दोन तास लागू शकतात. एकापेक्षा जास्त रक्तवाहिन्यांमध्ये करणे आवश्यक असेल, तर यास अडीच ते तीन तास लागू शकतात. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्ण जागृत राहतो आणि बोलत राहतो. याचा अर्थ अँजिओप्लास्टी प्रक्रिया वेदनादायक नसते.