राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी या सहा जणींची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. यात दीपिका संजय चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, आभा विजयकुमार पांडे, ॲड. संगीता चव्हाण, ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, उत्कर्षा रुपवते यांचा समावेश आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी आयोगाचे सदस्यपद अद्याप रिक्त होते. या रिक्त पदांवर सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका संजय चव्हाण, शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर, राष्ट्रवादीच्या आभा विजयकुमार पांडे, ॲड. संगीता चव्हाण, समाजसेविका ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया आणि काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते दादासाहेब रुपवते यांची कन्या समाजसेविका उत्कर्षा रुपवते यांची सदस्यपदी नियुक्ती कऱण्यात आली आहे.