Controversy between Shinde group and BJP: विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत रातोरात शिवसेना सोडली. शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेवून स्वत:चा वेगळा गट स्थापन केला. यानंतर शिंदे गटाने (Shinde Gut) भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात नवे सरकार स्थापन केले. सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे (Controversy between Shinde group and BJP). याला कारण ठरले आहेत. ते शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar). कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये (Sillod news) भाजपकडून बंदचं आवाहन करण्यात आले आहे. सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेने केलेल्या  (Maharashtra Politics) करवाढी विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिल्लोड तालुक्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद उफाळून आला आहे. याठिकाणी भाजप आंदोलन करणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड शहरात नगरपालिकेनं प्रचंड करवाढ केल्याचा आरोप भाजपनं आरोप केला आहे. 


याच करवाढीविरोधात भाजपनं सिल्लोड बंदचं आवाहन केले. सिल्लोड शहरातील दुकानं व्यावसायिकांनी बंद ठेवावी, असं आवाहन भाजपकडून करण्यात आले. सिल्लोडमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि अब्दुल सत्तार यांच्यात कायमच वैमनस्य दिसून येते. ही नगरपालिका अब्दुल सत्तारांच्या ताब्यात आहे. या करवाढी विरोधात याआधीही भाजपनं ढोलबजाव आंदोलन केलं होतं. मात्र, त्यानंतरही फरक पडला नाही. त्यामुळे आता सिल्लोड बंद आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे. बंद दरम्यान रॅली काढून भाजपाने जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे. 


अब्दुल सत्तार Vs BJP?

महत्त्वाचं म्हणजे राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता असताना सिल्लोडमध्ये मात्र भाजप अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जाताना दिसते आहे,  राव साहेब दानवे यांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे.  राज्यात भाजपा- शिंदे सरकार सत्तेत आले तरी दोन्ही गटांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. राज्याचे कृषी मंत्री आणि शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यातीसल वाद सर्वांनाच माहित आहे. सिल्लोड हा राव साहेब दानवे यांचा हा लोकसभा मतदारसंघ असल्याने त्यांच्याच मतदार संघातील भाजप कार्यकर्ते सत्तार यांच्या विरोधात जात आहेत.