पुणे : सैन्यदलात निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने पत्नीवर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केली आहे. मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बीटी कवडे रस्ता येथील सीताडेल सोसायटीत ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारच्या सुमारास आई फोन उचलत नसल्यामुळे मुलीने सोसायटीतील शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता दरवाजा आतून लॉक असलेला आढळला.


शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असलेला दिसला. पोलिसांनी शेजाऱ्यांच्या घरातील गॅलरीतून आत प्रवेश करत आतून दरवाजा उघडला. त्यावेळी त्या मुलीचे आई आणि वडील दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.


निवृत्त कर्नल नारायण सिंह बोरा (वय 74) आणि पत्नी चंपा बोरा (वय 63) असे मृत्युमुखी पडलेले दोघांची नावे आहेत. पत्नी झोपलेली असताना नारायण सिंह बोरा यांनी तिच्या कपाळावर बंदुकीने गोळी झाडून त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. नैराश्यातून ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.