Exam scam | आरोग्य विभागाचा गट `क` चाही पेपर फुटल्याची तक्रार
राज्यात आरोग्य विभागाच्या गट ड, म्हाडा, एमआयडीसी आदी पेपरफुटीची प्रकरणे ताजी असताना, पुन्हा एका मोठ्या परीक्षेत घोळ झाला असल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे
सागर आव्हाड, पुणे: राज्यात आरोग्य विभागाच्या गट ड, म्हाडा, एमआयडीसी आदी पेपरफुटीची प्रकरणे ताजी असताना, पुन्हा एका मोठ्या परीक्षेत घोळ झाला असल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. आरोग्य भरतीचा 24 ऑक्टोबर 2021 झालेला गट क चा पेपर ही फुटल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी आरोग्य भरती ड चा पेपर फुटला होता. ड मधील पेपरफुटीतील आरोपींना केली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना तसेच संबधीत कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले होते.
आता पुन्हा आरोग्य विभागातील गड क चाही पेपर फुटल्याची तक्रार आरोग्य विभागाने रात्री उशिरा दिली आहे.
आरोग्य भरतीमध्ये क आणि ड मधील पेपरफुटल्याने उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आरोग्यभरती घोटाळा प्रकरणी, पुणे पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल
आरोग्यभरती गट क चा पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मूळचा अमरावतीचा असलेला निशीद गायकवाड आणि त्याच्या मित्राला नागपूर मधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.