Aroh Welankar Post For CM Eknath Shinde : शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत 40 आमदार गेलेत. त्यानंतर शिंदे गटाने थेट शिवसेनेवर दावा केला होता. ( Political News ) आता निवडणूक आयोगाचा निकालही शिंदे गटाच्या बाजुने लागला आहे. आता शिवसेना ही शिंदेंची झाली आहे. पक्षाबरोबर चिन्हही शिंदे गटाचे झाले आहे. (Maharashtra Politics)  त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्याकडे आता शिवसेना आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णय पाहता सगळीकडून यावर प्रतिक्रिया येत आहे. अनेक लोक त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टोरी पासून फेसबूक- ट्विटरपर्यंत सगळीकडून प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता चित्रपटसृष्टीतल लोक त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. काही कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, नेहमीच राजकीय घटनांवर स्पष्ट वक्तव्य करणारा अभिनेता आरोह वेलणकरनं यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. आरोहनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आरोह म्हणाला की 'अभिनंदन एकनाथ शिंदे! बाळासाहेब पण खूश असतील आज...'  (Aroh Welankar) 



आरोहनं केलेलं हे ट्वीट चर्चेचा विषय ठरला आहे. आरोहनं याआधी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यानं आनंद व्यक्त केला होता. एकनाथ शिंदे यांना जेव्हा मुख्यमंत्री पदावर नेमण्यात आले तेव्हा देखील त्यानं पाठिंबा दिला होता. इतकंच काय तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही आरोहनं त्यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. 


हेही वाचा : Shah Rukh Khan पासून मौनी रॉय पर्यंत 'या' कलाकारांनी लावली Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये हजेरी


निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला?


निवडणूक आयोगाने (EC) शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना मानून ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याचे आदेश दिले. पक्षाच्या नियंत्रणासाठी प्रदीर्घ लढाईनंतर आपल्या 78 पानांच्या आदेशात आयोगाने उद्धव ठाकरे गटाला राज्यातील विधानसभा पोटनिवडणूक पूर्ण होईपर्यंत ‘मशाल’ निवडणूक चिन्ह ठेवण्याची परवानगी दिली आहे.