Shah Rukh Khan पासून मौनी रॉय पर्यंत 'या' कलाकारांनी लावली Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये हजेरी

Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. 

Updated: Feb 18, 2023, 12:34 PM IST
Shah Rukh Khan पासून मौनी रॉय पर्यंत 'या' कलाकारांनी लावली Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये हजेरी title=

Smriti Irani Daughter Shanelle Irani Arjun Bhalla's Wedding Reception : केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची लेक शनेल इराणी ही काही दिवसांपूर्वीच अर्जुन भल्लासोबत विवाह बंधनात अडकली. शनेलनं राजस्थानमधील जोधपूर शहरातील एका सुंदर किल्ल्यावर सप्तपदी घेतल्या आहेत. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्यांनी राजस्थानमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी या रिसेप्शन पार्टीमध्ये बॉलिवूडपासून छोट्या पडद्यावरील अनेकांनी हजेरी लावली होती. त्यांचे फोटो आता समोर आले असून प्रचंड व्हायरल झाले आहेत. शनेल आणि अर्जुनच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत सगळ्यांचा किंग खान (King Khan) म्हणजेच 'पठाण' (Pathaan) शाहरुख खानही (Shah Rukh Khan) पोहोचला होता. 

या रिसेप्शन पार्टीतले काही फोटो अभिनेत्री मौनी रॉयनं शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मौनी तिचा पती आणि शाहरुख खान, स्मृती इराणी यांच्यासोबत दिसत आहे. स्मृती इराणी यांच्या मुलीची ही रिसेप्शन पार्टी लग्नाप्रमाणेच राजस्थानमध्ये झाली होती. त्यांच्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीनं सगळीकडे खळबळ उडवली होती. कारण त्यांच्या मुलीच्या लग्नात छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान या पार्टीत पोहोचला होता. त्याच्यासोबत मोनी रॉय (Mouni Roy) आणि तिचा पती सूरज नाम्बियार (Suraj Nambiar) देखील दिसला. शनेलच्या लग्नात यांच्या व्यतिरिक्त रोनित रॉय त्याच्या पत्नीनं देखील हजेरी लावली होती. याशिवाय छोट्या पडद्याची राणी म्हणून ओळखली जाणाऱ्या निर्माती एकता कपूर आणि जितेंद्र यांनी देखील हजेरी लावली होती. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या व्हायरल फोटोवर कमेंट करत नेटकरी स्मृती इराणी यांच्या लेकीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Shehzada Box office Collection Day 1 : कार्तिकच्या 'शहजादा' नं पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी यांच्या पहिलाय लग्नाची लेक शनेल आहे. तर स्मृती आणि झुबिन यांना मुलगा जोहर आणि मुलगी जोश ही दोन मुले आहेत. स्मृती यांची तिन्ही मुलं ही एकमेकांच्या जवळ आहेत. त्या तिघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. दरम्यान, एका मुलाखतीत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या की शनेलचं नाव शाहरुख खाननं ठेवलं आहे. तर तुम्हाल प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे. तर झुबिन इराणी हे शाहरुख खानचे जवळचे मित्र आहेत.