COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : अनेक शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच लहान मुलांना शिकवला जातो. पिंपरी चिंचवडमध्ये एका शाळेत शिक्षकांनी हे शिकवल्यावर लगेच काही आरोपींना पकडता आलं. पाहूया नेमका काय प्रकार घडला. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याची जाणीव मुलांना अनेक शाळात करून दिली जाते. पिंपरीच्या शाळेतही मुलींना अशीच माहिती देण्यात आली. शिक्षकांनी वर्गात ही माहिती दिल्यावर काही मुलींनी आपल्यालाही बॅड टच झाल्याचं शिक्षकांना सांगितलं. त्यानंतर शिक्षकाने तात्काळ मुलींच्या पालकांना बोलावून प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.


पालकांकडून शाळेच्या शिक्षकांचं कौतुक 


पालकांकडून शाळेच्या शिक्षकांचं कौतुक या घटनेनंतर पालकांनी त्या शाळेचे आणि शिक्षकांचे कौतुक केलंय. अशा पद्धतीने सर्वच शाळांमध्ये हे शिक्षण दिले तर त्याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास पालक व्यक्त करत आहेत. चिमुरड्या मुलींनाही असा अनुभव आला हे खरोखर संतापजनक. मात्र शाळेत शिक्षकांनी चांगल्या वाईट स्पर्शाबद्दल सांगितलं नसतं, तर आरोपी कदाचित सापडलेच नसते. याची किंमत कुणा दुसऱ्यांनाही मोजावी लागली असती. म्हणूनच प्रत्येक शाळेत हे ज्ञान देणं गरजेचं आहे. पालकांनीही घरात मुलांना हे शिकवणं जरुरी आहे.