पुणे : शहरातील चितोडे दाम्पत्यानं लष्कराच्या जवानांसाठी जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीवर म्हणजे सियाचीनमध्ये ऑक्सिजनचा प्लाँट लावण्याचा ध्यास घेतलाय. त्यासाठी सुमेधा चितोडे यांनी आपले स्त्रीधन विकून सव्वा लाख रुपये उभे केले आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे १३ हजार फूट उंचीवर सियाचिनमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे तिथे शत्रूपासून मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी लागणारा प्रायवायू कृत्रिम ऑक्सिजनच्या साठ्यावरच आपल्या जाँबाज जवानांना अवलंबून राहवं लागतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि म्हणूनच सियाचीनमध्येच  कृत्रिम ऑक्सिजन प्लाँट लावण्याचा चितोथे दाम्पत्याचा मनोदय आहे. त्यासाठी साधारण १ कोटी १० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. राज्यातल्या प्रत्येक कुटुंबानं या प्रकल्पासाठी फक्त एक रुपया दान करावा असं चितोडेंचं आवाहन आहे. त्यासाठी चितोडे दाम्पत्यानं एक न्यासाची स्थापना केली असून या न्यासाला दिली जाणाऱ्या मदतीची पावती देण्यात येणार आहे. ऑक्सिजन प्लाँटमध्ये सुमारे ९००० जवानांना प्राणवायू मिळणार आहे.


त्या एवढ्यावर थांबलेल्या नाहीत. त्यांनी प्रत्येकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे सांगितले. प्रत्येकाचा थोडा तरी हातभार लागला तर हे काम सहज शक्य होईल. प्रत्येकांने जरी एक रुपया दिला तरी मोठा हातभार लागेल आणि आपल्या जवानांना चांगला ऑक्सिजन घेता येईल. त्यामुळे प्रत्येकांने हातभार लावाला, असे आवाहन त्या करत आहेत.