Farmer News: बळीराज्याच्या हातात आलेला घास बकऱ्यांच्या तोंडात!
Pune News : सध्या पाऊस चांगल्या प्रतीचा पडला असला तरी मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यातून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनूसार टॉमेटोला चांगला बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याला चक्क शेतात शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे.
हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे: टोमॅटोला योग्य बाजार (tomato market rate) भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतात बकऱ्या (sheep) चरण्यासाठी सोडल्या. भोर तालुक्यातील कांजळे गावातील रहिवासी शेतकरी कुणाल कामठे यांनी टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने दोन एकरवरच्या टोमॅटोच्या शेतात बकऱ्या चरण्यासाठी सोडल्या. नाईलाजाने टोमॅटोचा फड शेतकऱ्यांनी सोडून दिला आहे. टोमॅटोचे दर कमालीचे घसरल्यानं सध्याच्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतात बकऱ्या-शेळी सोडण्याचा निर्णय घेतला. (As the no market price for tomato farmers decided to leave the goats in the tomato field to eat)
काय आहे सध्याची परिस्थिती?
राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून टोमॅटोला सध्या किलोला दोन ते तीन रूपये कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरातील टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांवर उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे. टॉमेटोचा मजूरी खर्चही निघत नसल्याने टॉमेटोचा शेतातच लाल चिखल झाला आहे. टॉमेटो उत्पादक (production) शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलं आहे. याच नुकसानग्रस्त टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी समोर मांडल्या आहेत.
हेही वाचा - On Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...
खरंतर यावर्षी खूप चांगला पाऊस झाला होता आणि शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं तो वाढवला होता. परंतु बाजारभाव न मिळाल्यानं दुर्दैवानं शेतकऱ्यांना शेतातील पिकावर शेळ्या - मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे. टॉमेटो आणि फ्लावर या दोन पिकांना आम्ही मुंबईच्या बाजारपेठेत (mumbai market) पाठवलं होतं परंतु तिथे काहीच बाजारभाव न आल्यानं आम्हाला शेवटी बाजारात सोडण्याची वेळ आली आहे. आम्ही यावेळी पाऊस चांगला पडल्यानं टॉमेटोची लागवडही चांगली केली होती परंतु त्यातून बाजारभाव न आल्यानं शेळ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
हापूस आंब्यावरही वाईट वेळ?
लांबलेला पाऊस, गायब झालेली थंडी आणि अवकाळी पाऊस यामुळे हापूस (alphanzo) आंब्याची फळ प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सातत्याने होत असलेल्या वातावरण बदलामुळे कोकणातल्या हापूस आंबा उत्पादनावर परिणाम होताना दिसून येतो आहे. परिणामी लाखो हेक्टरवर असलेले आंबा पीक धोक्यात आले असून शेतकरी दिवसेंदिवस चिंतेत जात आहे. या साऱ्याचा परिणाम आर्थिक उलाढालींवर देखील होताना दिसत आहे.