औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादाविरोधात लढायचे असतेच तर त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी दिली नसती, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवेसी यांनी केले. ते गुरुवारी औरंगाबाद येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही सर्वात मोठे खोटारडे आहात. तुम्हाला कधीच दहशतवादाविरोधात लढायचे नव्हते. तुम्हाला खरंच तसे करायचे असते तर तुम्ही दहशतवादाचा आरोप असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिलीच नसती, असे ओवेसी यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप ओवेसी यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

VIDEO: तुरुंगातील अत्याचारांबद्दल सांगताना साध्वी प्रज्ञांना भर सभेत रडू कोसळले


मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा यांनी बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना लगेचच भोपाळमधून उमेदवारीही जाहीर करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. जर मी एखाद्या संशयित दहशतवाद्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असते तर देशभरात किती क्षोभ उसळला असता याची कल्पना करा. प्रसारमाध्यमांनी #mehboobaterrorist असे हॅशटॅग वापरून बातम्या चालवल्या असत्या. जेव्हा हिंदू दहशतवादाचा मुद्दा येतो तेव्हा यांच्याकडून दहशतवादाला धर्म नसतो असे सांगितले जाते. एरवी सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवले जाते. निर्दोष सिद्ध होईपर्यंत प्रत्येकजण आरोपीच असतो, असे मेहबुबा मुफ्ती यांनी सरकारला सुनावले होते.