पुणे: विठ्ठलनामाचा जयघोष करत अवघी पुण्यनगरी दुमदुमन गेली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाल्या होत्या.आज दोन्ही पालख्यांचे मार्ग बलदणार असून तुकोबांची पालखी लोणी काळभोर मार्गे मार्गस्थ होईल. माऊलींची पालखीतला सर्वात खडतर टप्पा म्हणून ओळखा जाणारा दिवेघाटातला प्रवास आज वारकरी पूर्ण करणार आहे. दिवेघाट मार्गे सासवडमध्ये पोहचल्यावर तिथेच माऊलींचा विसावा असेल..यानिमित्तानं वारकऱ्यांसोबतच पुणेकरांचाही मोठा उत्साह पहायला मिळतोय. आज पहाटेपासूनचं माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीये.. पुण्यात केवळ आणि केवळ माऊली-तुकोबांचाच गजर ऐकायला मिळतोयं...


बालवारकऱ्यांचा विठूनामाचा गजर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आषाढी वारीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते वारीत सहभागी झालेल्या बाल वारकऱ्यांनी.. विठूनामाचा गजर करत  हे वारकरी  पंढरपूरच्या दिशेनं निघालेत... आधारतिर्थ आश्रम शाळेनं या बाल वारकऱ्यांच्या दिंडीचं आयोजन केलंय..  हे बाल वारकरी  आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुलं  आहेत..  आत्महत्या करू नका असा संदेश त्यांनी वारीनिमित्त शेतकऱ्यांना दिला आहे.


वारकऱ्यांसाठी मोबाईल एटीएम व्हॅन


दरवर्षी वारीला मोठ्या संख्येने वारकरी येत असतात..पण या प्रवासात बऱ्याचदा वारकऱ्यांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी हाल व्हायचे..कारण प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना एटीएम उपलब्ध होतीलचं असं नाही...म्हणून आता समर्थ बॅंकेच्या वतीनं मोबाईल एटीएम व्हॅन वारीमध्ये सुरु करण्यात आलीये.. ही व्हॅनही या पालखीबरोबरचं प्रवास करणारये..त्यामुळे वारकऱ्यांना याचा चांगलाच लाभ होणार आहे.