पुणे : भाजपने (BJP) शिवसेनेला (Shiv Sena) दे धक्का दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके (Ashatai Buchke) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचके यांनी पक्षप्रवेश केला आहे. (Ashatai Buchke joined the BJP) पुणे जिल्ह्यात  शिवसेनेला हा मोठा झटका मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशाताई बुचके शक्तीप्रदर्शन करत पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जवळपास 15 वर्ष त्यांनी शिवसेनेचे काम केले होते, मात्र 2019मधील लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जुन्नर तालुक्यात मोठा राजकीय बदल शिवसेनेने केला होता. महिलांचे मोठ नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या आशा बुचके यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्या भाजपचे कमळ हाती घेतले आहे.


आशाताई बुचके या पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यावर आशाताई बुचके यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली होती.


2014 मध्ये आशाताई बुचके यांनी शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र केवळ पाच हजार मतांच्या फरकाने त्यांना मनसेच्या शरद सोनावणेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले आणि त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. त्यानंतर बुचकेंनी अपक्ष निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.