शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे, देवीची आरती आणि शिवसैनिकांची गर्दी
रश्मी ठाकरे आनंद दिघे यांच्या देवीच्या दर्शाला ठाण्यात
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) ठाण्यात (Thane) दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात रश्मी ठाकरे यांचं ठाकरे समर्थकांनी जोरदार स्वागत केलं. ठाण्यात दाखल होताच रश्मी ठाकरे यांनी आनंद आश्रम इथल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं.
त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या टेंभी नाका इथल्या देवीच्या दर्शन घेतलं. मानाची देवी अशी ठाण्यातील टेंभी नाका (Thane Tembhi Naka) जय अंबे देवीची ओळख आहे. स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी टेंभी नाका जय अंबे देवीची स्थापना केली होती.
रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली तसंच खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.