राजकारणाचा वारसा, आदर्श घोटाळा अन् वनवासातून पुन्हा सत्तेत, अशोक चव्हाणांचं `राज`कारण प्रवास
Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचा एकनिष्ठ नेता आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चार वर्षांनंतर कॅमबक केल्यानंतर अशोक चव्हाणांची ही खेळीने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे.
Who is Ashok Chavhan : राजकीय वारसा, वडील आणि मुलगा मुख्यमंत्री बनणारी पहिलीच जोडी, काँग्रेसमधील एकनिष्ठ आणि शांत स्वभावाचे नेते अशी ओळख असणारे अशोक चव्हाण यांच्या एका मोठ्या निर्णयाने महाराष्ट्रातील राजकारणात भूंकप आला आहे. लोकसभा निवडणूक 2024 ची पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मोठा निर्णयाने काँग्रेसला धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ माजली आहे. या पूर्वी अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसमधील चांगली फळी भाजपमध्ये जाणार असल्याच बोलं जातं आहे. अशोक चव्हाण यांच्या या राजीनामानंतर त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास डोळ्यासमोर येत आहे. (Ashok Chavan resigns congress Legacy of Politics Adarsh Scam and Return to Power from Exile Ashok Chavan's Political Journey in marathi)
घरातूनच राजकारणाचे धडे
अशोक चव्हाण यांच्या जन्म जरी मुंबईत झाला असला तरी ते मुळचे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील. पण त्यांच्या खरी मुळं ही नांदेडमधील असल्याने चव्हाण घराणं आणि नांदेड हे समीकरणच...वडील शंकरराव चव्हाण यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलं. या पितापुत्राने काँग्रेसला मराठवाड्यात मोठं केलं. बीएसस्सी आणि एमबीए पदवी असताना वडिलांसोबत त्यांनी 1985 मध्ये राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ही महत्त्वाची जबाबदारी त्यांनी निष्ठेने पाळली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 1987 मधील लोकसभा निवणडणुकीत अशोक चव्हाण विजयी झाले आणि ते नांदेडचे सर्वस्व झाले.
भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पराभव करुन वयाच्या 30व्या वर्षीच अशोक चव्हाण खासदार झाले. त्यानंतर 1992 मध्ये ते विधानपरिषदेचे सदस्य आणि मग 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाले. 1995 ते 1999 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव भूषवलं. त्यानंतर 2003मध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले.
विलासराव यांच्या पायउतारा आणि अशोक पर्वाची सुरुवात
मुंबईत 2008 मधील झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. खरं त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे यांचं नाव खूप चर्चेत होतं. पण त्यांना डावलून मुख्यमंत्रीपदाची सूत्र अशोक चव्हाणाला देण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री हा मराठवाड्यचा असाला हवा असा निर्णय झाल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांची संधी हुकली.
अशोक चव्हाण यांचं अजून एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्यावेळी दिल्ली दरबारात त्यांचं वजन असल्याने महाराष्ट्रात अशोक पर्व सुरु झालं होतं. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर गंभीर आरोप झाला. अशोक पर्व नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज दिल्याचा आरोप त्या काळ त्यांच्यावर झाला त्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आणि राजकीय प्रवासाला उतरती कळा लागली.
काँग्रेसचा आदर्श असलेल्या नेत्याला आदर्श घोटाळ्याचा डाग!
पेड न्यूजमुळे अडचणीत आल्यानंतर अजून एक मोठ्या आरोप त्यांच्यावर झाला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा झाल्याच उघड झालं. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा आरोप अशोक चव्हाणांवर झाल्यानंतर राजकारणातील त्यांचा प्रवास संपला असं वाटलं. या प्रकरणात त्यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. सीबीआय चौकशीला पहिला नकार आणि नंतर परवानगी. पण न्यायालयाने चव्हाणांविरोधात केस चालवण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला.
वनवासातून पुन्हा सत्तेत!
पेड न्यूज आणि नंतर आदर्श घोटाळा यामुळे अशोक चव्हाण हे नाव राजकारणातून नाहीस होत होतं. अशोक चव्हाण यांच्या वनवास तब्बल चार वर्ष चालला. पण त्यांनी हार मानली नाही, पुन्हा एकदा राजकारणात दमदार एन्ट्री केली. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी मिळवून त्यांनी शेर अभी जिंदा है हे दाखवून दिलं. खरं तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दोनच जागांवर कब्जा करु शकलं त्यातील एक नाव अशोक चव्हाण यांचं होतं. मोदी सरकाराने काँग्रेसचा सुपडा साफ केला. आता पुन्हा एक निवडणूक 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांची राजीनामाची खेळ भविष्यात काय रंग आणेल हे वेळच सांगेल. पण काँगेससाठी अशोक चव्हाण यांचं पक्षातून जाणं हा आतापर्यंतचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे.