अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण - एकनाथ खडसेंचा भाचा राजेश पाटील अटकेत
नवी मुंबई: पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आलीय.
नवी मुंबई पोलीसांची कारवाई
भुसावळमध्ये राहणारा राजेश पाटील याला नवी मुंबई पोलीसांनी अटक केलीय. राजेश पाटील हा भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा भाचा असल्याचं पुढे आलंय. याप्रकरणी प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला अटक झाल्यावर त्याच्या चौकशीतून रोज नवे धागेदोरे समोर येत आहेत. त्यावर आधारित कारवाईतून राजेश पाटीलला अटक करण्यात आलीय.
राजेश पाटील वीज विभागाचं कंत्राटं घेऊन उदरनिर्वाह करतो. अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या तेव्हा कुरुंदकर आणि राजेश पाटील यांचा संपर्क होता असं चौकशीत पुढे आलंय.त्यावरूनच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.