प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : आशियातील खंडातील सर्वात मोठी गुहा  महाराष्ट्रात (Asia largest cave in maharashtra) आहे. गोंदियातील  40 वर्ष जुनी परंपरा असलेल्या कचारगड यात्रेमुळे (Kachargarh Yatra) ही गुहा चर्चेत आली आहे. 18 राज्यातील आदीवासी बांधव लाखोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात. गुहेत जवळपास पाच हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्थ घनदाट जंगलात कचारगड गुहा असुन आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धास्थान असुन या गुफेत आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत म्हणजे "पारी कोपार लिंगो" ची मूर्ती आहे. मागील 40 वर्षा पासून या ठिकाणी यात्रा भरत आहे.                                    


या कचारगड यात्रेला महाराष्ट्रासह इतर 18 राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने आपल्या कुलदेवतेची पूजा व दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावतात. अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस सुरु असते. 


कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते. कचारगड मध्ये असलेली गुफा ही निसर्ग निर्मित असुन आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुफा आहे. तसेच या गुफेत जवळपास पाच हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात, इतकी जागा या गुफेत उपलब्ध आहे.


आदिवासी बांधव दरवर्षी कोया पौर्णिमेला या ठिकाणी येत आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत असतात. या वेळी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळते. या यात्रे करिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मिझोरम, मेघालय आदी 18 राज्यातून लाखो आदिवासी भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते. कचारगडच्या गुफेत आदिवासींचे आराध्य दैवत म्हणजे *"पारी कोपार लिंगो"* ची मूर्ती आहे.


या दैवताचे दर्शन घेण्यासाठी आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थिती लावतात. त्याच प्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव या यात्रेवेळी आप आपल्या राज्याच्या पंरपरेनुसार आदिवासी नृत्याचे संस्कृतीचे सादरीकरण करतात. त्यामुळे संस्कृतीचा अभ्यासकांसाठी ही यात्रा एक प्रकारची पर्वणीच ठरते.


या आदिवासी बांधवाच्या यात्रे दरम्यान आदिवासी समाजातील रोटीबेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत. असते त्यामुळे या यात्रेला अतिशय महत्व असते कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ देखील या यात्रे साठी तैनात करण्यात येतो.