`भाजपाच्या बाजूने लढणारा कार्यकर्ता राष्ट्रभक्तीची लढाई लढतोय`
पुण्यात भाजपा विजय संकल्प मेळावा
पुणे : भाजपच्या बाजूने लढाई लढत असलेला कार्यकर्ता राष्ट्रभक्तीची लढाई लढत असल्याचे विधान भाजपा राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. देश आणि समाजाला बळकट करणारी लढाई आपण लढत आहोत. विरोधी पक्षातील निम्मे नेते एकतर जेलमध्ये आहेत नाहीतर बेलवर ( जामिनावर ) आहेत असेही ते म्हणाले. पुण्यात भाजपा विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे भाजपच्या पश्चिम माहाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकले गेले. भाजपचे सहसंघटन मंत्री व्ही सतीश, खासदार गिरिश बापट, भाजपात नुकतेच प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांच्यासह सर्व आमदार या कार्यक्रमात उपस्थित होते.
कधीकाळी पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आज तो भाजपचा बालेकिल्ला झाला. निवडणूक ही हवेवर जिंकता येत नाही. आम्ही जोडतोडीऐवजी केलेल्या कामाच्या आधारावर निवडणूक लढतो असे नड्डा म्हणाले. देशात २३०० राजकीय पक्ष आहेत, त्यातील ७ राष्ट्रीय तर ६९ राज्य पातळीवरील पक्ष आहेत. इतर पक्ष व्यक्तीत अथवा कौटुंबिक पक्ष आहेत. या सगळ्यांत खरी लोकशाही केवळ भाजपमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले.
महत्त्वाचे मुद्दे
अनच्छेद ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी संसदेच्या सभागृहात बहुमत घडवून आणलं. या निर्णयामुळे जम्मु काश्मिरसह संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. जम्मु काश्मिरमध्ये आजवर केवळ ३ परिवारांचा फायदा झालाय.
एक देश, २ निशाण आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही ३७० हटवलं. जिथं शामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं ते काश्मिर आमचं आहे. त्यासाठी आम्ही ३७० काढून टाकलं.
नरेंद्र मोदींनी १०० दिवसात अनेक महत्वपूर्ण कामं केली. इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समोर जात आहे.