मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेना-भाजपामध्ये बंडखोरांचे प्रमाण वाढले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात बंडखोरांना शांत करण्यास काही प्रमाणातच यश आले आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीचा मतदार संघ निवडला आहे. राज्यभरात बंडखोरांचे आव्हान तर आहेच त्यासोबतच सध्या आरे प्रकरण देखील युतीच्या यशात अडथळा आणणार असं दिसतंय. या सर्व पार्श्वभुमीवर उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मेळाव्याची जय्यत तयारी शिवाजी पार्कवर सुरू आहे. दसरा मेळाव्यातूनच शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता आहे. 



विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्यात य़ुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. बीडमध्ये दसरा मेळाव्याला अमित शाह प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. तर मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार आहेत. 


नागपूरात संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार याकडं लक्ष लागले आहे. या सगळ्यांचा भाषणाचा रोख विधानसभा निवडणूका असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.