मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : भाजपा-सेना युती बुलढाणा विधानसभा मतदार संघात तुटली असून भाजपाचे बंडखोर नेते योगेंद्र गोडे यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. स्वतःच्या प्रचार फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपमधून दुर्लक्षित केलेले मंत्री एकनाथ खडसे यांचे फोटो लावून मी भाजपाचा उमेदवार आहे हे भासवण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवार योगेंद्र गोडे हे करीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


युतीचा धर्म भाजपा सेनेमध्ये बुलढाणा मतदारसंघात पाळताना दिसल्या जात नाही. भाजपाचे सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते युतीचा, धनुष्यबाणाचा प्रचार करण्याऐवजी अपक्ष उमेदवार योगेंद्र गोडे यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत.
 
भाजपचे बंडखोर उमेदवार योगेंद्र गोडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरच मत मागून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न बुलढाणा विधानसभा मतदारसंघात करताना दिसून येत आहेत.