पालघरमध्ये `या` ठिकाणी महायुतीत आणि आघाडीत बंडखोरी
राज्यभरात बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पालघर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. अनेक दिग्गजांनी शक्तीप्रदर्शन करत काल आपला उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये ज्यांना तिकिट नाही मिळाले ते बंड करण्याच्या पावित्र्यात आहेत. याचा फटका महायुती आणि आघाडी दोघांनाही बसला आहे. राज्यभरात बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पालघर जिल्ह्यात तीन ठिकाणी महायुतीमध्ये तर एका ठिकाणी आघडीत बंडखोरी समोर आली आहे. बोईसर विधानसभा मध्ये भाजपने बंडखोरी करून संतोष जनाठे यांनी अपक्ष उमेदवारी भरली आहे. ही जागा शिवसेनेला सोडली आहे.तर विक्रमगड विधानसभेत भाजपच्या अधिकृत उमेदवार असताना भाजपच्या तीन जणांनी बंडखोरी करित उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तर डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपकडे असताना शिवसेनेने तिथे वैदही वाढण हिचा अपक्ष अर्ज भरला आहे.यामध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यश्या सुरेख थेतले, जेष्ठ नेते हरिश्चंद्र भोये, मधुकर खुताडे यांचा समावेश आहे.
तर आघाडी कडून पालघर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून अमित घोडा व काँग्रेस मधून योगेश नम या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज भरलेत. येत्या दोन दिवसात बंडखोर उमेदवारांशी संवाद साधून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगू असेही सांगितले जात आहे. त्यामुळे बंडखोरी शमवण्यात यश येईल का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.