जालना : वसंतदादांचं सरकार घालवण्याइतकं हे सरकार घालवणं सोपं नाही असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. आज उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ घनसावंगी येथे जाहीर प्रचारसभा घेतली. या सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रात सरकार आपलंच असणार असून महाराष्ट्रात होणाऱ्या या निवडणुकीत चमत्कार करून दाखवणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकलाच पाहिजे असंही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेना भाजप ही युती असून निवडणूकीनंतर नेता कोण हे समोर येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली. कोणत्याही परिस्थितीत मी हे सरकार घालविन असं शरद पवार सांगतात. मात्र वसंत दादा पाटील यांचं सरकार घालवण्याइतकं हे सरकार घालवणं सोपं नाही अशी टीका उद्धव देखील उद्धव ठाकरे यांनी केली.


गडकरींची स्तुती 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत परंतु येथील रस्ते खड्डेयुक्त आहेत, गडकरींनी केंद्रातील निधीतून उड्डाणपुलाची चांगली कामं केली मात्र विदर्भासह राज्यात रस्त्यांच्या दयनीय अवस्थेस मुख्यमंत्र्यांची निष्क्रियता जबाबदार असल्याचं वक्तव्य यवतमाळमध्ये शरद पवारांनी केलं आहे.


गुजरातकडून येणार्‍या सूचनांचंच पालन मुख्यमंत्री करीत असून देश आणि राज्याचं त्यामुळे नुकसान होत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. समोर कोणताच पहेलवान नाही असे बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांच्या काळात किती कारखाने बंद झाले, किती रोजगार गेले, शेतकरी आत्महत्येची आकडेवारी जरी दिली तरी त्यांचे कतृत्व दिसेल अशी बोचरी टीका पवारांनी केली.