भाजपच्या संकल्पपत्रात फुले-सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचं संकल्पपत्र जाहीर केलं आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचं संकल्पपत्र जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांनी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. याशिवाय संकल्प पत्रात १ कोटी रोजगार, २०२२ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी, शेतकऱ्यांना १२ तास वीज अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. येत्या ५ वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरवर नेण्याचं ध्येय असल्याचं या संकल्पपत्रात मांडण्यात आलं आहे.
भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे
- येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार उपलब्ध करणार
- ५ वर्षात शेतीला लागणाऱ्या वीज सौर उर्जेवर देऊन १२ तास वीज देणार
- २०२२ पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी
- मुलभूत सेवेसाठी केंद्र सरकारच्या मदतीने ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
- ५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार
- कोकणातील १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा विषय, पूर्व विदर्भातील पाणी पश्चिम विदर्भात आणणार, पुरात वाहून जाणारे पाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागासाठी वापरणार
- भारत नेट आणि महाराष्ट्र नेटच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला इंटरनेटने जोडणार
- शिवरायांचे स्मारक, बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण करणार
- ३० हजार किमीचे रस्ते बनवणार
- १६७ टीएमसी पाणी दुष्काळी भागात नेणार
- मराठवाड्यात वॉटर ग्रीड राबवणार